Logo

ग्रामपंचायत जातेगाव

ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर

उपलब्ध लोकसेवा

सेवा हक्क अधिनियम अंतर्गत ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती व अर्ज प्रक्रिया

उपलब्ध लोकसेवा

जन्म नोंदणी व प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
  • आई-वडील यांचे आधारकार्ड
  • आशा/अंगणवाडी कार्यकर्ती यांचा अहवाल
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय कागदपत्रे
प्रक्रिया:
  • जन्म गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या जन्माची नोंदणी त्याच ठिकाणी केली जाते.
पहिले मोफत, नंतर 20 रुपये 7 दिवस

मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
  • मयत व्यक्तीचे आधारकार्ड
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय/पोलीस स्टेशन कागदपत्रे
प्रक्रिया:
  • मृत्यू गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते.
पहिले मोफत, नंतर 20 रुपये 7 दिवस

विवाह नोंदणी व प्रमाणपत्र

विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.

आवश्यक कागदपत्रे:
  • विवाहाचे ज्ञापन
  • वर-वधूचे जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार/मतदार कार्ड/ड्रायविंग लायसन्स
  • रेशन कार्ड/वीजबिल/पासपोर्ट
  • लग्नपत्रिका
  • शपथपत्र
  • लग्नाचे फोटोग्राफ्स
  • पासपोर्ट फोटो (2)
  • तीन साक्षीदार फोटो (2)
  • घटस्फोट आदेश प्रत
  • पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र
प्रक्रिया:
  • प्राप्त अर्ज व कागदपत्रे यांची छाननी केली जाते. खात्री झाल्यावर विवाह नोंदणी केली जाते.
विवाह नोंदणी ५० ते २०० रुपये, प्रमाणपत्र २० रुपये

दारिद्र्य रेषेखालील दाखला

दारिद्र्य रेषेखालील असलेल्या यादीत नाव असल्यास दाखला दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
प्रक्रिया:
  • यादीत नाव तपासून दाखला दिला जातो.
20 रुपये 7 दिवस

नमुना नं 8 चा उतारा

नमुना नंबर 8 मधील स्वमालकीच्या मालमत्तेचा उतारा दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
प्रक्रिया:
  • नमुना नं 8 रजिस्टरवरून नाव तपासून उतारा दिला जातो.
20 रुपये 5 दिवस

निराधार असल्याचा दाखला

कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंब प्रमुख नसल्याचा दाखला दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
  • कुटुंब प्रमुख मृत्यू प्रमाणपत्र
प्रक्रिया:
  • चौकशी व खात्री करून प्रमाणपत्र दिले जाते.
निःशुल्क 20 दिवस
अर्ज प्रक्रिया
1

अर्ज सादर करा

विहीत नमुन्यात ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर करा.

2

अर्ज व कागदपत्रे पडताळणी

ग्रामपंचायत कार्यालयात प्राप्त अर्ज व कागदपत्रे यांची पडताळणी होईल.

3

प्रमाणपत्र वितरण

पात्र अर्जदारास विहीत कालमर्यादेत प्रमाणपत्र दिले जाईल.

अर्ज नमुना डाउनलोड करा

जन्म मृत्यु अनुपलब्धता अर्ज

Download

लोकसेवा अर्ज

Download

विवाहनोंदणी अर्ज

Download
कर भरणा QR Code

1. ग्रामनिधी

ग्रामनिधी QR Code

सूचना: या QR Code चा वापर करून कर भरणा केल्यास पेमेंट केल्याचा screenshot, मिळकत धारकाचे नाव, मालमत्ता क्रमांक ही माहिती पावतीसाठी ग्रामपंचायतीला त्याच दिवशी कळवावी.

2. पाणीनिधी

पाणीनिधी QR Code

सूचना: या QR Code चा वापर करून कर भरणा केल्यास पेमेंट केल्याचा screenshot, मिळकत धारकाचे नाव, मालमत्ता क्रमांक ही माहिती पावतीसाठी ग्रामपंचायतीला त्याच दिवशी कळवावी.