उपलब्ध लोकसेवा
सेवा हक्क अधिनियम अंतर्गत ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती व अर्ज प्रक्रिया
सर्व पहा
उपलब्ध लोकसेवा
अर्ज प्रक्रिया
अर्ज नमुना डाउनलोड करा
कर भरणा QR Code
उपलब्ध लोकसेवा
जन्म नोंदणी व प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे:
अर्ज
आई-वडील यांचे आधारकार्ड
आशा/अंगणवाडी कार्यकर्ती यांचा अहवाल
आवश्यकतेनुसार रुग्णालय कागदपत्रे
प्रक्रिया:
जन्म गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र
येथे झालेल्या जन्माची नोंदणी त्याच ठिकाणी केली जाते.
पहिले मोफत, नंतर 20
रुपये
7 दिवस
मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले
जाते.
आवश्यक कागदपत्रे:
अर्ज
मयत व्यक्तीचे आधारकार्ड
आवश्यकतेनुसार रुग्णालय/पोलीस स्टेशन कागदपत्रे
प्रक्रिया:
मृत्यू गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते.
पहिले मोफत, नंतर 20
रुपये
7 दिवस
विवाह नोंदणी व प्रमाणपत्र
विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.
आवश्यक कागदपत्रे:
प्रक्रिया:
प्राप्त अर्ज व कागदपत्रे यांची छाननी केली जाते. खात्री झाल्यावर विवाह नोंदणी केली जाते.
विवाह नोंदणी ५० ते २००
रुपये, प्रमाणपत्र २० रुपये
—
दारिद्र्य रेषेखालील दाखला
दारिद्र्य रेषेखालील असलेल्या यादीत नाव असल्यास दाखला दिला जातो.
आवश्यक कागदपत्रे:
प्रक्रिया:
यादीत नाव तपासून दाखला दिला जातो.
20 रुपये
7 दिवस
नमुना नं 8 चा उतारा
नमुना नंबर 8 मधील स्वमालकीच्या मालमत्तेचा उतारा दिला जातो.
आवश्यक कागदपत्रे:
प्रक्रिया:
नमुना नं 8 रजिस्टरवरून नाव तपासून उतारा दिला जातो.
20 रुपये
5 दिवस
निराधार असल्याचा दाखला
कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंब प्रमुख नसल्याचा दाखला दिला जातो.
आवश्यक कागदपत्रे:
अर्ज
कुटुंब प्रमुख मृत्यू प्रमाणपत्र
प्रक्रिया:
चौकशी व खात्री करून प्रमाणपत्र दिले जाते.
निःशुल्क
20 दिवस
अर्ज प्रक्रिया
1
अर्ज सादर करा
विहीत नमुन्यात ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर करा.
2
अर्ज व कागदपत्रे पडताळणी
ग्रामपंचायत कार्यालयात प्राप्त अर्ज व कागदपत्रे यांची पडताळणी होईल.
3
प्रमाणपत्र वितरण
पात्र अर्जदारास विहीत कालमर्यादेत प्रमाणपत्र दिले जाईल.
कर भरणा QR Code
1. ग्रामनिधी
सूचना: या QR Code चा वापर करून कर भरणा केल्यास पेमेंट केल्याचा screenshot, मिळकत धारकाचे नाव,
मालमत्ता क्रमांक ही माहिती पावतीसाठी ग्रामपंचायतीला त्याच दिवशी कळवावी.
2. पाणीनिधी
सूचना: या QR Code चा वापर करून कर भरणा केल्यास पेमेंट केल्याचा screenshot, मिळकत धारकाचे नाव,
मालमत्ता क्रमांक ही माहिती पावतीसाठी ग्रामपंचायतीला त्याच दिवशी कळवावी.