नागरिकांना लागणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध.
गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व मोफत प्रमाणपत्र दिले जाते.
गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व मोफत प्रमाणपत्र दिले जाते.
विवाह नोंदणी अधिनियम १९९८ नुसार विवाहाची नोंदणी करून प्रमाणपत्र देण्यात येते.
ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर सर्व कर भरलेला असल्यास हे प्रमाणपत्र मिळते.
गावाचा रहिवासी असल्याचा दाखला तसेच मालमत्तेच्या नोंदीचा उतारा ग्रामपंचायतीत उपलब्ध.
वार्षिक उत्पन्नाचा दाखला ग्रामसेवकाकडून दिला जातो.